पंढरपूर येथे शेकडो वर्षांची परंपरा असणारा बैठकीची लावणी महोत्सव...

0

पंढरपूर प्रतिनिधी--- पंढरपूर येथे होळी ते रंगपंचमी या काळात शेकडो वर्षांची परंपरा असणारा बैठकीची लावणी हा कार्यक्रम रविवार, २४ मार्च ते शनिवार, ३० मार्च या कालावधीत जुनी माळी गल्ली येथील श्री एकनाथ भवन येथे रात्री साडेआठ ते १०:३० या कालावधीत होणार आहे.

   उत्पात समाजातील मनोहर ऊर्फ छबू काका उत्पात, श्याम ऊर्फ विनय उत्पात, अनिल उत्पात, प्रसाद उत्पात ही मंडळी बैठकीच्या लावण्या सादर करणार आहेत. गेली अनेक वर्षे ज्ञानोबा ऊर्फ माऊली उत्पात या लावण्या सादर करीत असत, मंगळवार, २६ मार्च रोजी मोडनिंब येथिल महिला कलावंत आपली कला सादर करणार आहेत. नंदा-उमा इस्लामपूरकर, राष्ट्रीय युवा रत्न पुरस्कार प्राप्त प्रमिला लोदगेकर, प्रेमा घाटणेकर या प्रार्ट्या कला सादर करणार आहेत.लावणी म्हणजे मराठी शारदेच्या पायातील चाळ आहेत. शाहिरानी डफावर थाप मारून मर्दानी पोवाडे रचले.   

लावणीचा हाच वारसा कै. ज्ञानोबा उत्पात, वा. म. उत्पात, बी.डी. उत्पात या मंडळीनी जोपासला व वाढविला. ज्ञानोचा उत्पात यांनी उत्पात गल्लीतील लावणी दिल्ली पर्यंत गाजवली.होळी पौर्णिमा ते रंगपंचमी या काळात दिवसा मिष्टान्न भोजन व रात्री लावणी आजही चालू आहे.पेशवाईमध्ये शाहिरी लावण्या जास्त प्रमाणात गायल्या जात असत. महाराष्ट्रात तर सर्वदूर लावणी कार्यक्रम होत असत. परंतु जुन्या मराठी लावणीचे वेड पंढरपुरातील उत्पात मंडळीना पूर्वी पासूनच आहे ते आजही टिकून आहे. वै. दादबा उत्पात, वै. ज्ञानेश्वर गोपाळ उत्पात पूर्वी लावणी गायन होळी पोर्णिमा ते रंगपंचमी पर्यंत ते बंदिस्त खोलीत स्वांतुखाय गात असत.

सुरुवातीला डफाच्या साथीने लावणी गायन चालत असे परंतु पुढे मृदंगाचार्य कै. शंकरअप्पा मंगळवेढेकर तबला साथ करू लागले आणि डफाच्या तालावरची लावणी खऱ्या अर्थान खुलू लागली. लावण्यांच्या रचना भडक श्रृंगारिक जरी असल्या तरी बिभत्स नाहीत. दर्जेदार आहेत. म्हणून पु. ल. देशपांडे, वसंतराव देशपांडे यांनी जेव्हा या लावण्या ज्ञानोबा उत्पातांकडून ऐकल्यावर ते खूपच प्रभावीत झाले आणि उत्पात वाड्यातील लावणी खऱ्या अर्थाने बाहेर आणली. तो लावणी मंडळाचा सुवर्णकाळ होता. दुर्गा भागवत, पं. भीमसेन जोशी, छोटागंधर्व, कुमारगंधर्व, जितेंद्र अभिषेकी, बाबूजी या सारख्या दिग्गजांनी ज्ञानोबा उत्पातांच्या लावणी संपूर्ण कार्यक्रमास थांबले व कार्यक्रमानंतर ते म्हणाले, उत्पात तुमची लावणी नाही, मूलावणी आहे. अशा या उत्पात लावणीचा वारसा पंढरपुरात आजही चालू आहे. जुन्या मराठी लावणीच्या रचना, चाली अवगत असणारी उत्पात मंडळी हा कार्यक्रम होळी ते रंगपंचमी पर्यंत करतात.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)