लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. यात माढ्यामधून माझ्या उमेदवारीचा समावेश आहे. भाजपने सर्वे करून उमेदवार विजयी होण्याची खात्री असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी दिली आहे. मोहिते पाटील यांनी आपल्या उमेदवारीस विरोध दर्शविला आहे. याबाबत पत्रकांरानी विचारले असता खासदार निंबाळकर म्हणाले, सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची मागणी केली होती. मात्र भाजपने मला उमेदवारी दिली आहे.
माढा लोकसभा मतदार संघातून मी दोन ते तीन लाख मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचे - उमेदवार खासदार रणजीत सिंह - नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. खासदार निंबाळकर हे पंढरपुरात भाजपचे नेते व माढा मतदार संघाचे क्लस्टर हेड प्रशांत परिचारक यांची भेट घेण्यासाठी आले होते.त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मोहिते-पाटील गटाला चांगले सहकार्य केले आहे. यामुळे मोहिते पाटील गट वेगळा निर्णय घेणार नाही असा मला विश्वास आहे असे त्यांनी सांगितले. मोहिते पाटील गटाचा आपणास विरोध असल्याने आपली उमेदवारी कापली जाणार आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा प्रसार माध्यमातून होत आहे असे विचारले असता खासदार निंबाळकर म्हणाले, प्रसार माध्यमे मिनटा मिनिटाला बातम्या बदलतात. यामुळे त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. भाजपने मला उमेदवारी दिली आहे. यामुळे पुन्हा उमेदवारी कापणे असे प्रकार होणार नाहीत. तरी प्रसार माध्यमांनी आपली विश्वासार्हता राहावी म्हणून योग्य बातम्या देणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.


