पंढरपूर ; अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक,थोर मराठा कै.आमदार आण्णासाहेब पाटील यांची जयंती साजरी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष जाधव,शहराध्यक्ष अमोल पवार,शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे,शहर संघटक काका यादव,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष हनुमंत कदम, इसबावी अध्यक्ष सुनील घाडगे,महिला शहराध्यक्षा डॉ संगीत पाटील, तालुका अध्यक्षा रतनताई थोरवत, तालुका उपाध्यक्षा अर्चनाताई चव्हाण, शहर उपाध्यक्षा अश्विनीताई साळुंखे,विजयाताई खामकर यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


