शिवाजी मोरे यांची युवक मराठा महासंघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड

0


 पंढरपूर - मा शिवाजीराजे मोरे यांंची युवक मराठा महासंघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.निवडीचे पत्र सोलापूर जिल्हाध्यक्ष मा श्री अर्जुनराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष जाधव,शहराध्यक्ष अमोल पवार,शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे,शहर संघटक काका यादव,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष हनुमंत कदम, इसबावी अध्यक्ष सुनील घाडगे,महिला शहराध्यक्षा डॉ संगीत पाटील, तालुका अध्यक्षा रतनताई थोरवत, तालुका उपाध्यक्षा अर्चनाताई चव्हाण, शहर उपाध्यक्षा अश्विनीताई साळुंखे,विजयाताई खामकर यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)