रुक्मिणी सहकारी बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..... संस्थापक चेअरमन सौ. सुनेत्राताई पवार यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर

0

 


रुक्मिणी सहकारी बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत कर्जवाटप योजनेचा सभासदानी लाभ घ्यावा. चेअरमन सुनेत्राताई पवार

पंढरपूर -- पंढरपूर येथिल रुक्मिणी सहकारी बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १७.०९.२०२३ रोजी श्री रूक्मिणी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृह पंढरपूर येथे संपन्न झाली.सभेचे दीपपज्वलन उपस्थित संचालक व पालक व सभासद यांचे शुभ हस्ते करण्यात आले. नंतर अहवाल सालात देशातील निधन पावलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी या सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभेचे प्रास्थाविक विषय पत्रिका वाचन प्रभारी व्यवस्थापक बाळासाहेब चौगुले यांनी केले. सहकार बोर्डाचि चव्हाण साहेब यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले



   यावेळी सभासदांना मार्गदर्शन करतांना बँकेच्या संस्थापक चेअरमन सौ. सुनेत्राताई पवार यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. मार्च २०२३ अखेर बँकेकडे रु. ३५.६० कोटी देवी तर रु. २१.३५ कोटी कर्ज येणे आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १८.०८% असुन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशापमाणे अग्रक्रम क्षेत्रास ७९.४३% तर दुर्बल घटकांस ७१.७४% कर्ज पुरवठा केलेला आहे. चालु वर्षात बँकेला १५.७० लाख नफा असुन बँकेस अ वर्ग मिळालेला आहे बँकेचे कामकाज संपूर्ण संगणकीकृत झालेले असुन कोअर बँकिंग प्रणाली सुरू केलेली आहे त्यामुळे ग्राहकांना त्वरीत सेवा मिळत आहे. सध्या बँकेत RTGS NEFT ची सोय असून बँकेसाठी IFSC कोड मिळालेला आहे. सध्या बँकेत तत्काळ सोनेतारण कर्जाची सोय असून अल्पदरात लॉकरची सुविधा आहे. नियमित कर्ज परतफेड करणा-या कर्जदारास २% सवलत व्याज देण्यात येते. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत कर्ज चाटप चालु केलेले आहे..

यावेळी संस्थापक मार्गदर्शक श्री. विजयसिंह पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेत सर्व संचालकांचा सत्कार बैंक कर्मचारी व सभासद यांचे हस्ते करण्यात आला तसेच सभासदांचे गुणवान पाल्य चि सुयश बाळासाहेब निंबाळकर यांचा पारितोषिक रू. १००१ चा धनादेश देऊन गौरव करण्यात आला. इंजिनिअर वाळासाहेब वाघमारे अमीत फाळके यांचा ही गौरव करण्यात आला 



या सभेस संस्थापक मार्गदर्शक श्री. विजयसिंह पवार जेष्ट संचालक सौ. सुनेत्राताई पवार चेअरमन सविता लोखंडे व्हा. चेअरमन डॉ बी आर पाटील संचालक रविंद साळुंखे दिलीपराव चव्हाण नवनाथ तांबवे दत्तात्रय निंबाळकर संचालिका सो जयश्री खडतरे सुनंजय पवार अँड मिनल पाटील संजय निंबाळकर अनिल चव्हाण प्रदीप  जाधव वर्षा पाटील मी सुप्रिया पवार नंदिणी गायकवाड संतोष कवडे काशिनाथ गोगांव व अँड डी जे भोसले अँड संजय व्यवहारे व वसुधा कुंभार ललीता सांळुखे रामहरी देठे व इतर सभासद उपस्थित होते. व आभार प्रदर्शन पांडुरंग चव्हाण यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी प्रशांत खांडेकर रविंद्र मोरे संतोष कुंभार बाळासाहेब निंबाळकर राहुल सुरवसे शैलेश कांबळे , बाबुराव जुमिवाले योगेश माळी राहुल ननवरे नितिन सलगर पांडुरंग शिंदे शंकर खताडे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)