पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयटी व एडीटी संस्थेच्यावतीने व मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली इसबावी येथे 301 झाडांचे वृक्षारोपण

0

                                             

पंढरपूर- देशाचे कणखर पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एमआयटी व एडीटी संस्थेचे कार्यकारी संचालक मंगेशबापू कराड व कार्यकारी अध्यक्ष सुनिताताई कराड यांनी आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर पालख्या आल्यानंतर वारकरी भाविकांचे ऊणापासून संरक्षण व्हावे यासाठी 10 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला. त्यानुसार पंढरपुरात वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या खुल्या जागेवर माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली इसबावीचे माजी नगरसेवक गणेश अधटराव, संग्राम अभ्यंकर, अर्बन बॅंकेचे माजी चेअरमन प्रभाकर महाजन बडवे, माजी नगरसेवक घंटी व एमआयटीचे नामदेव जंजीरे, माऊली खोमणे, केतन साठे, अर्जुन गर्जे यांनी इसबावी येथील नवीन गणेश मंदिर पटांगण, जिल्हा परिषद शाळा, साई मंदिर, शिवाजी नगर, सह्याद्री नगर तसेच जुना गणपती मंदिर अशा अनेक ठिकाणच्या खुल्या जागेवर खड्डे घेवून 150 वृक्षारोपण करण्यात आले तसेच शेळवे येथील कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज परिसरात 151 वृक्षारोपणाचे काम चालू आहे. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामुळे अनेकांनी सदरच्या उपक्रमाचे कौतुक केले. एमआयटी व एडीटी संस्थेच्यावतीने चंद्रभागा नदीची नित्य पुजा करणारे पुरोहित दत्तात्रय बाळासाहेब बडवे-शिंदे हे उपस्थित होते. 

तसेच सदर वृक्षारोपण मंगेशबापू कराड व सुनिताताई कराड यांनी केलेल्या संकल्पाप्रमाणे त्यांनी वृक्षारोपणाचा शुभारंभ केलेला आहे त्यानंतरच हा सदरचा उपक्रम राबविण्यात आला. सदरच्या उपक्रमासाठी गणेश अधटराव यांनी अनमोल सहकार्य केले व संग्राम अभ्यंकर यांनी वृक्ष लागवडीत मोलाचे सहकार्य केले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)