पंढरपूर अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न --आर्थिक वर्षात सुमारे 29.09 कोटी इतका ढोबळ नफा

0

 




होतकरू व गरजू तरूणांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा-चेअरमन सतीश मुळे

 

पंढरपूर अर्बन बँकेस सन 2022-23 या आर्थिक वर्षात सुमारे 29.09 कोटी इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे व सहकारी संचालक मंडळाचे वतीने 111 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये देणेत आली.

बँकेची 111 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या कर्मयोगी सभागृहशाखा नवीपेठपंढरपूर येथे आज सोमवार 18 सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. श्री.पांडुरंगचे व स्व.सुधाकरपंत परिचारक यांचे प्रतिमेचे पूजन करून सभेची सुरवात करणेत आली. यावेळी बँकेचे कुटुंबप्रमुख मा..प्रशांत परिचारकबँकेचे सर्व आजी माजी संचालकसभासद तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवरपत्रकार आदी उपस्थित होतेबैठकीपुर्वी उपस्थित सभासदांचे प्रशिक्षण कार्यक्रम घेणेत आलापंढरपूर अर्बन बँकेचा प्रधान कार्यालयासह 31 शाखा कार्यरत असून सुमारे 2500 कोटी पर्यंत व्यवसायवृध्दी झाली आहेबँकेला कराव्या लागणाऱ्या तरतूद वजा जाता मार्च 2023 अखेर रू.56 लाख इतका नफा आहेसभासदांच्याग्राहकांच्या विश्वासावरच बँक व्यवसायवृध्दी करीत आहे.

यावेळी बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी बँकेच्या सभेस उपस्थित असलेल्या सभासद व मान्यवरांचे स्वागत करून बँकेची आर्थिक परिस्थितीसभेच्या नोटीशीतील ठराव व आलेल्या प्रश्नोत्तरांचे वाचन करणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुचित केलेश्री.उमेश विरधे यांनी अहवाल वाचन केलेयामध्ये सभासदांनी सभेच्या नोटीसीवरील विविध सर्व ठरावास आवाजी मतांनी मंजूरी देण्यात आलीसंचालक श्री.हरिष ताठे यांनी उपस्थितांचे आभार मानलेयावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन सौ.माधुरीताई जोशी यांनी दिवगंत सभासदहितचिंतकग्राहक यांना श्रध्दांजली वाहिली.

 माजी नगराध्यक्ष श्री.सुभाष भोसलेश्री.संजय अभ्यंकर आदींनी प्रश्न विचारले होतेरामेश्वर यंपे गुरूजी यांनी संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध झालेबद्दल सर्व सभासदसंचालक मंडळ व मा..प्रशांतराव परिचारक यांचे आभार मानले.

बँकेचे मार्गदर्शक कुटूंबप्रमुख श्री.प्रशांतराव परिचारक हे अहवाल सालातील संचालक मंडळाचे चेअरमन असल्याने त्यांनी सभासदांना मार्गदर्शन करावे अशी विनंती संचालक श्री.हरिष ताठे यांनी सांगितलेत्यावेळी सभासदांनी उपस्थित केलेले त्यांचे काळातील माहितीबाबत आश्वासक उत्तरे देत भविष्यात बँक आणखी सक्षमपणे  ग्राहकाभिमुख सेवा राबवेल असे सुचित केलेसध्या बँकेने कर्जाचे व्याजदर हे स्पर्धेत टिकून राहणेसाठी 8.50% पर्यंत खाली आणले आहेतत्याचाही ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केलेबँकेने आत्तापर्यंत लहान-मोठे व्यवसायिकव्यापारी व उद्योजक यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणेसाठी विविध कर्ज योजना दिल्या आहेतआता बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व्याज परतावा योजना दिली आहेत्याचा लाभ घेणेत यावाअसे आवाहन चेअरमन यांचे वतीने करणेत आले.

यावेळी बँकेचे संचालक रजनीश कवठेकरराजाराम परिचारकहरिष ताठेपांडुरंग घंटीशांताराम कुलकर्णीविनायक हरिदासअमित मांगलेअनंत कटपगणेश शिंगणऋषिकेश उत्पातव्यंकटेश कौलवारसंगिता पाटीलमनोज सुरवसेअनिल अभंगरावगजेंद्र मानेतज्ञ संचालक सीए अतुल कौलवारप्रभुलिंग भिंगेबोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य उदय उत्पातसोमनाथ होरणेशुभम लाड तसेच सोलापूरचे सल्लागार संगम रघोजीदिनकरभाऊ मोरेसुधाकरपंत परिचारक साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळेवसंतनाना देशमुखदाजी भूसनरलक्ष्मण पापरकर आदीमान्यवर तसेच सभासदठेवीदारविविध संस्थाचे पदाधिकारीग्राहकहितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)