डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचार व त्यांचे जीवन कार्य याचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गीत गायनाचा कार्यक्रम पंढरपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण आंबेडकर नगर या ठिकाणी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या गायनाचा कार्यक्रम 16 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील व शहरातील तमाम नागरिकांनी उपस्थित राहुन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
   आज रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण आंबेडकर नगर या मैदाना मध्ये कलामंचकाचे पूजन करते समय अभिजीत आबा पाटील बोलत असताना पुढे म्हणाले  हा कार्यक्रम विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे या विठ्ठल प्रतिष्ठानला सर्व समाजातील लोकांनी सहकार्य करण्याचे ठरवलेले आहे आणि या सर्व सामाजिक संघटनेचे सहकार्य या कार्यक्रमास लाभणार आहे असे अभिजीत आबा पाटील यांनी आपल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले.

 
  