महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना पदाधिकाऱ्यांचे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यात आवाहन

0

वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी आंदोलनास सज्ज रहा 

जळगाव : महाराष्ट्र सरकारने वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ गठीत करावे यासाठी आंदोलनात्मक लढाईसाठी सज्ज राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी केले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव, नंदूरबार, धुळे व नाशिकसह उत्तर महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान आयोजित बैठकांमध्ये याबाबत वृत्तपत्र विक्रेत्यांना आवाहन केले.यावेळी राज्य संघटना कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, कार्यकारणी सदस्य गोपाळ चौधरी, उपाध्यक्ष रविंद्र कुलकर्णी, संघटन सचिव महेश कुलथे उपस्थित होते.
     महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना पदाधिकाऱ्यांचा दौरा उत्तर महाराष्ट्रात आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याअंतर्गत राज्य संघटना पदाधिकाऱ्यांनी नंदुरबार, धुळे, मालेगाव, सटाणा, नाशिक व जळगाव येथे वृत्तपत्र विक्रेता संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक परिस्थिती, प्रश्न जाणून घेत त्यावर मार्ग काढण्यासाठी राज्य पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या कामाचा आढावा सादर केला.राज्य संघटनेकडून वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी केले जात असणारे प्रयत्न, आमदार व मंत्रीमहोदय यांच्या भेटी, निवेदने, आंदोलने याबाबत माहीत देण्यात आली. राज्य सरकारची भूमिका व संघटनेचे भविष्यातील धोरण याबाबत माहीती देण्यात आली. संघटनेची ताकद वाढण्यासाठी, संख्यात्मक ताकद राज्यकर्ते व समाजासमोर यावी यासाठी प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्याने राज्य संघटनेचे सभासद व्हावे. त्यासाठी संघटनेचे खास बनवलेल्या ॲपबाबतची माहीती देण्यात आली.ॲपच्या माध्यमातून तात्काळ सभासद नोंदणीचे आवाहन करण्यात आले.
      यावेळी बोलताना श्री पाटणकर म्हणाले राजे संघटनेच्या माध्यमातून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याचे काम वृत्तपत्र विक्रेता संघटना करीत आहे. सभासद नोंदणीसाठी संघटनेचे स्वतंत्र ॲप तयार करण्यात आले असून जास्तीत जास्त वृत्तपत्र विक्रेत्यांनी राज्य संघटनेचे सभासद व्हावे. राज्य संघटनेचे आगामी अधिवेशन मालेगाव येथे घ्यावे असे आवाहन पाटणकर यांनी केले.
   राज्य संघटना सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी सांगितले,  राज्य संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारकडे याबाबत वारंवार पाठपुरावा सुरू आहे. मात्र अद्यापही सरकार याबाबत सकारात्मक भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे यापुढे वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावी लागणार आहेत. या आंदोलनाचे व्याप्ती तालुक्यापासून मंत्रालयापर्यंत राहील. लवकरच आंदोलनाची दिशा व धोरण ठरवले जाईल. राज्य संघटनेच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक शहरात तालुक्यात मोठ्या ताकतीने आंदोलन करण्यात यावे. 
   राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार यांनी सांगितले, सभासद नोंदणीसाठी संघटनेचे स्वतंत्र ॲप तयार केले आहे, त्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीने व कमी वेळात राज्य संघटनेचे सभासद होता येत आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्थानिक प्रश्न असोत अथवा जिल्हा राज्य पातळीवरचे प्रश्न आहोत असो त्याची सोडवणूक होण्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक विक्रेत्यांनी संघटनेचे पाठीशी राहावे. वृत्तपत्रांनी विक्रेत्यांनी एकजूट राहणे ही काळाची गरज आहे.   संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांनी  राज्य संघटनेचे 2024 चे अधिवेशन मालेगाव मध्ये घेण्याबाबत साठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.
यावेळी  जळगावचे विलास वाणी, नितिन चौधरी, विजय कोतकर, रविंद्र जोशी, संजय निंबाळकर, मालेगाव शहर संघटनेचे संजय जगताप, अशोक नागमोती, संतोष शर्मा, भूषण अलई, संजय तरवटे, देवेंद्र नागमोती, दीपक यादव, नंदू गवळी, नामदेव यादव, मधू यादव, नाशिकमधील नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना अध्यक्ष चंद्रकांत पवार, वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था नविन नाशिक सिडको अध्यक्ष अजय बागूल, सुनिलभाऊ मगर, भरत माळवे, राहुल दुशिंग,  किशोर सोनवणे, विजय सोनार, गौतम सोनवणे, हर्षल ठोसर,  वसंतराव घोडे, ज्ञानेश्वर धात्रक,प्रविण चौधरी,  सचिन शेटे नंदुरबारमधील जेष्ठ सदस्य लक्ष्मण वाणी, शहराध्यक्ष किशोर देसाई,उपाध्यक्ष नाशिर पठाण, सचिव राजेश काशिद, उमेश वाणी सटाणा (बागलान) शहर संघटना अध्यक्ष सुनिल सातव,  जेष्ठ  विक्रेते संजय अहिरे, गुरुप्रसाद कुलकर्णी, सागर जाधव, संजय शिंदे, बापू बागुल, सुरेश सातव आदी पदाधिकारी उपस्थित होते.


--------------

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)