श्री विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक लढविण्यास अभिजीत पाटील पात्र विरोधकांच्या हरकतीस पूर्ण विराम

0
पंढरपूर--विनोद पोतदार पंढरपूर श्री विठ्ठल सह साखर कारखाना निवडणूक लढविण्यास युवा उद्योजक श्री अभिजीत पाटील पात्र असल्याचा  निर्वाळा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिला असून यामुळे पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या वृत्तामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला असून या निवडणुकीत अभिजीत पाटील यांच्या पॅनल चे मोठे आव्हान असणार आहे, अभिजित पाटील हे चार साखर कारखान्याचे अध्यक्ष असल्याने ते निवडणूक लढविण्यास अपात्र आहेत,अशी तक्रार विरोधकांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली होती. यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार होता,त्यानुसार त्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे,असा निर्णय घेण्यात आला आहे, या सकारात्मक बातमीने अभिजीत पाटील यांच्या समर्थकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर विरोधकांना पाटील यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे निकाल कसा लागेल याची चिंता लागून राहिली आहे, आता ही निवडणूक भगीरथ भालके, कल्याणराव काळे,तसेच युवराज पाटील,व अभिजीत पाटील अशी तिहेरी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, सुमारे ६००कोटी कर्ज असणारा हा साखर कारखाना एकेकाळी पंढरपूर तालुक्यातील शान होता,या कारखान्याकडे स्वतःची ६००एकर जमीन असून अनेक वर्षे कारखाना उत्तम चालत होता पण  मागील चार वर्षांपासून घरघर सुरू झाली, स्व आमदार भारत भालके यांनी  दोन वर्षांपूर्वी कारखाना चालविण्यासाठी अनुदान मिळवून तो चालू केला होता, पण कोरोना काळात पुन्हा कारखाना बंद पडला ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले,कामगारांचे पगार तटल्याने मोठया असंतोषाला सामोरे जावे लागले होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)