प्रतिनिधी :भारत विकास परिषद शाखा पंढरपूर (पश्चिम महाराष्ट्र) व डॉ. काणे मेडीकल असोसिएशन, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल, सोलापूर यांचे सहकार्याने महीलांसाठी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर निदान तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाविप चे अध्यक्ष डॉ सुरेंद्र काणे यांनी दिली आहे.
भारत विकास परिषद व डॉ काणे मेडिकल असोसिएशनच्या वतीने प्रतिवर्षी महिलांच्या कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन केले जाते.. यंदा महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन केले आहे. सोलापूर येथील सिध्देश्वर कॅन्सर हाॅस्पिटल येथील तज्ञ डॉक्टर व स्टाफ या शिबिरासाठी येणार असल्याचे डॉ काणे यांनी माहिती दिली.
या शिबीरात आल्यावर सर्वप्रथम नांव नोंदणी आवश्यक आहे.तपासणी संख्या मर्यादित आहे याची कृपया नोंद घ्यावी.या साठी डॉ. समाधान माने अॅड. राजेंद्र केसकर ९४२२४६३२०८
७०२०२८९९९८९ इंजि. मिलिंद वाघ ९४२२०६९९८९ सौ. रोहिणी कोर्टीकर मॅडम, सौ. मोनिका शहा, सौ. शिल्पा चौंडावार, सौ. रेखा टाक, मंदार केसकर ९४२२३८०९४ यांच्या कडे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे
चौकट
शिबिर कधी व कोठे
शिबीराचे स्थळ : गायत्री हायटेक हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पंढरपूर डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ, वीर सावरकर मार्ग, पंढरपूर दूरभाष: (०२१८६) २२३२३४
शिबीराची वेळ : मंगळवार दि. १९ एप्रिल २०१२ रोजी सकाळी ९ ते १२ पर्यंत

