प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाल्यामुळे श्री संत दामाजी साखर कारखाना निवडणूक प्रक्रियेला वेग

0

मंगळवेढा : मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदारयादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. प्रादेशिक सहसंचालक सोलापूर कार्यालय व कारखाना कार्यस्थळावर ही यादी एकाच वेळी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती पुणे साखर संघाचे सोलापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांनी दिली.



   या यादीत 28 हजार 157 मतदारांचा समावेश आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंगळवेढा येथिल श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची कच्ची मतदारयादी जाहीर झाल्याने निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे . पात्र-अपात्रचा विषय अनेक महिने रेंगाळत आल्याने या यादीमध्ये आपला समावेश आहे का हे पाहण्यासाठी सभासद कारखाना कार्यस्थळाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.
    सभासदांच्या कच्च्या यादीवर 20 ते 29 एप्रिलदरम्यान या प्रारूप मतदारयादीवर आक्षेप व हरकत दाखल करता येणार आहे. तेथून हरकती व आक्षेप यांच्यावर निर्णय 2 मे ते 11 मेपर्यंत घेतला जाणार असून, 17 मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. प्रारूप मतदारयादी दामाजी कारखाना कार्यस्थळावर तसेच प्रादेशिक सहसंचालक (साखर ) सोलापूर या कार्यालयात पहाण्यासाठी उपलब्ध आहे, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक पांडुरंग साठे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)