पंढरपूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील तसेच पंढरपूर चे रहिवाशी असलेले पोलीस हवालदार श्री.सुनील कुलकर्णी आज दिनांक 31 मार्च 2022 रोजी सेवेतून निवृत्त झाले.त्यांनी आपल्या सेवा कार्यकाळ सोलापूर ग्रामीण पोलीस विभागा मध्ये सोलापूर शहर, मंगळवेढा तसेंच पंढरपूर शहर आणि श्री. विठ्ठल रुक्मिणी सुरक्षा विभागात सेवा करत त्यांनी आपल्या 39वर्षाचा पोलीस दलातील सेवा कार्यकाळ पूर्ण केला.
त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने श्री.स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.स्वामी समर्थ प्रतिष्ठान चेसंतोष कुलकर्णी, अमित भादुले,चंद्रकांत भागानगरे, संजय ताठे,शशिकांत जोशी सर,सुरेश खोबरे,पत्रकार नंदकुमार देशपांडे,अर्जुन कारटकर, पंढरपूर हाथवे चॅनेल चे विजय देशपांडे,तसेंच नानासो परिचारक व पंढरपूर राष्ट्रवादी चे सचिव दत्तात्रय माने उपस्थित होते.



