विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूरच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0

 


पंढरपूर /प्रतिनिधी  :

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान 131 वी जयंती महाउत्सव समितीच्या वतीने दि.14 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवतीर्थ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातल उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 40 मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पंढरपूर शहर व तालुक्याचे नावलौकिक केल्याबद्दल 40 मान्यवरांचा विशेष सन्मान, पंढरपूर शहरातील सर्व पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष यांचा व कोरोना महामारीमध्ये उल्लेखनीय मदतकार्य केल्याबद्दल पंढरपूर शहर व तालुक्यातील 40 कोरोना योध्दांना पुरस्कार देवून व पंढरपूर नगरपालिकेच्या 40 आशा वर्कर महिला यांना कोरोना योध्दा पुरस्कार देवून सन्मान करून साडी वाटप करण्यात येणार आहे. ‘निळे वादळ’ हा भीमगीतांचा भव्य कार्यक्रम होणार आहे, तरी पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.नगरसेवक डि.राज. सर्वगोड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)