कर्मवीर वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन

0


 पंढरपूर – “वार्षिक नियतकालिक हे विद्यार्थ्यांसाठी लेखनाचे व्यासपीठ मिळवून देणारे साधन असून महाविद्यालयाच्या इतिहासातील तो महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो. महाविद्यालयीन जीवन हे अत्तरासारखे असून त्याचा सुगंध हवेत दरवळत राहतो. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कलागुणांना वाव देवून व्यक्तिमत्त्वाचा विकास केला पाहिजे. वाचन, लेखन, संभाषण आणि श्रवण या कौशल्याचा विकास केला पाहिजे. ‘कर्मवीर’ या नियतकालिकाने महाराष्ट्राला अनेक साहित्यिक दिले. रयत शिक्षण संस्था आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कर्मवीर अंकाने नावलौकिक मिळविला आहे.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाचा ‘कर्मवीर’ वार्षिक नियतकलिकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ‘कर्मवीर’अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे यांनी मनोगते व्यक्त केले.  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संपादक प्रा. डॉ. प्रशांत नलावडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रमेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. तानाजी लोखंडे, डॉ. चांगदेव कांबळे, डॉ. तुकाराम अनंतकवळस, डॉ. विनया पाटील,प्रा. सुमन केंद्रे, डॉ. बालाजी लोंढे, डॉ. उमेश साळुंखे, प्रा. अमोल मोरे, प्रा. सुहास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. दत्तात्रय डांगे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)