पत्रकार सुरक्षा समिती ची पंढरपूर येथे बैठक, तालुका अध्यक्ष पदी प्रशांत माळवदे यांची निवड

0


पंढरपूर -( प्रतिनिधी )  पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश सचिव डॉ आशिषकुमार सुना होते सदर बैठकीचे आयोजन जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी केले होते

सदर बैठकीत

प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा

पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी

पत्रकारांसाठी विमा व घरकुल योजना

जेष्ठ पत्रकारांना समान पेन्शन मिळणे

राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी

राज्यातील युट्युब व वेबपोर्टल ला शासकीय मान्यता व जाहिराती

कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना शासकीय मदत व वारसाला शासकीय सेवेत समाविष्ट करणे

यादीवर नसलेल्या वृतपत्र ला पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती मिळणे

या सह पत्रकारांच्या अनेक विषयावर चर्चा करण्यात आली

प्रशांत माळवदे यांची निवड



पंढरपूर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार व तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांची पत्रकार सुरक्षा समिती च्या पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी एक मताने निवड करण्यात आली यावेळी मान्यवरांचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला 

संघटित असल्याशिवाय पत्रकारांचे प्रश्न सूटणार नाहीत

राज्यात बातमी लावणाऱ्या वरून पत्रकारांवर होणाऱ्या हल्यात वाढ झाली असून बातमी लावण्या वरून हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला असून  पत्रकारांनी संघटित असणे काळजी गरज असून संघटित असाल तरच प्रश्न सूटतील असं बैठकीत प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी सांगितले



ओळख पत्र वितरण

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांच्या हस्ते तालुका अध्यक्ष प्रशांत माळवदे अशपाक तांबोळी सचिन कुलकर्णी विजयकुमार मोटे बिरूदेव केंगार विठ्ठलराव वठारे सुरेखा भालेराव अमर कांबळे सचिन माने महादेव भोसले यांना ओळख पत्र प्रदान करण्यात आले

या बैठकीचे सूत्रसंचालन रवींद्र शेवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन नूतन तालुका अध्यक्ष प्रशांत माळवदे यांनी केले

या बैठकीला दत्ता पाटील, विश्‍वास पाटील, कुलकर्णी बाबा काशीद अण्णा धोत्रे कबीर देवकुळे  प्रा दत्ता खिलारे विनोद पोतदार नागनाथ गणपा उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप देवकुळे यांचा ही फेटाबांधून व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)