पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रा. औदुंबर लोंढे यांचे "गांधी विचार व दर्शन" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होतो. हे व्याख्यान मोठ्यात उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड महाविद्यालयात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. उमेश घोलप, सिद्धेश्वर लवटे, अविनाश वाघमारे, विनायक माळी, गणेश रणदिवे, बापु रणदिवे आदीच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या पुजनांनतर प्रा. औदुंबर लोंढे यांचे "गांधी विचार व दर्शन" या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ऑनलाईन सहभागी झालेल्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांना महात्मा गांधी यांच्याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. महात्मा गांधी यांचा जीवनपट उलघडून विविध उदाहरणासह गांधी यांची जीवनशैली बद्दल माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी*पंढरपूर सिंहगड मध्ये "गांधी विचार व दर्शन" या विषयावर ऑनलाईन व्याख्यान संपन्न*

