टाकळी रोड परिसरातील रस्ते अंधारमय.... ग्रामपंचायत कराचे करते तर काय ?

0
पंढरपूर : (शिवम पाटील) शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या लक्ष्मी टाकळी गावातील आजूबाजूला सुमारे वीस ते पंचवीस उपनगरे वसली असून या उपनगरात राहणाऱ्या  रस्त्यांना प्रकाशमय  करणारे पथदिवे बंद अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळेस वाटसरू व वाहनचालकांना अत्यंत उपयुक्त ठरणारे पथदिवे चालु नसल्यामुळे अडचणी येत आहेत.
पथदिवे चालु नसल्यामुळे साप, विन्चू , कीटक जंतू आदीच्या दंशाने  जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तसेच अंधारात चोरीचे प्रमाण सुद्धा वाढू शकत, पथदिवे चालू असल्यास नागरिकांना सुरक्षेचे दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे. 
याचा विचार करता पथदिवे लवकरात लवकर चालु करण्यात यावे अशी मागणी टाकळी रोड परिसरातील तरुण पिढी करत आहे.
जर यावर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत आणि सदर बंद असलेल्या सर्वलाईट लवकरात लवकर चालू केल्या नाहीत तर वरिष्ठांना याबद्दल रितसर तक्रार करून यावर चौकशी करण्यासाठी पत्र व्यवहार करणार आहोत. असे नागरिकांचे याबद्दल म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)