पंढरपुरातील हा रस्ताच असाय की, येथे पाहण्यास मिळतात डान्सीग कार अन्‌ गाड्या

1
पंढरपूर शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या लक्ष्मी टाकळी गावातील आजूबाजूला सुमारे वीस ते पंचवीस उपनगरे वसली असून या उपनगरातील राहणाऱ्या नागरिकांना विज आरोग्य तसेच रस्ता याचा सतत सामना करावा लागत आहे उपनगरातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून रस्ता पाण्यात पाण्यात रस्ता सध्या अशी अवस्था माऊली नगर हनुमान नगर आदी नगरातून पहावयास मिळते सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असलेल्या ग्रामपंचायतीत विकासाच्या कामाबाबत मात्र शह-काटशह याचे राजकारण चालू असल्याने त्यांच्या या वागण्यामुळे नागरी सुविधा वर मोठा परिणाम झाल्याचे जाणवत आहे. आता पावसाळ्यात तर या रस्त्यांवर वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
    पंढरपूर उपनगरातील टाकळी हद्दीतील माऊली नगर परिसरामध्ये काही दिवसांपासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे माऊली नगरकरांची गैरसोय होत आहे. वाहन चालवणे अतिशय धोकेदायक झाले असून टू व्हीलर नव्हे तर फोर विलर सुद्धा एखाद्या डान्सिंग कार प्रमाणे चालत असल्याचे दृश्य दिसून येते अनेक वेळा प्रभागातील राजकारणी लोकांना या गोष्टीबद्दल सांगितले असून सुद्धा याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसून या परिसरात एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का अशी विचारणा नागरिकांमधून होत आहे.
 
या रस्त्याबद्दल जेव्हा प्रभागातील लोकांना विचारणा केली असता त्यांनी त्यांचे मत काही अशा पद्धतीने मांडले
   
    प्रभाकर माने हे माऊली नगर येथील रहिवासी असून गेले वीस वर्ष येथे वास्तव्यास आहेत. पावसाळ्याच्या पूर्वी रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला होता परंतु टाकण्यात आलेला मुरूम अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे पहिलाच पावसाळ्यामध्ये त्याचे रूपांतर मातीमध्ये झाले आणि हा मुरूम  लाल खडकाचा असल्याकारणाने त्याचे लाल माती मध्ये रूपांतर झाले ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चिखल तयार झाल्याने गाडी चालवणे तर कसरतीचे होतेच परंतु या रस्त्यावरून चालत फिरणे  हेसुद्धा खूप कठीण होते अनेक वेळेस टाकळी प्रशासनाशी बोलूनही कोणताही फायदा झाला नाही. तरी या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे अशीच अपेक्षा
प्रदीप माने हे माऊली नगर चे रहिवाशी असून गेले वीस वर्ष येथे वास्तव्य आहेत नगरमध्ये वयोवृद्ध लहान मुले आहेत त्यांना या रस्त्यावरून चालणे किंवा घरातून बाहेर जाणे हे अतिशय जोखमीचे झाले असून लवकरात लवकर या रस्त्याचे काम व्हावे अशी अपेक्षा
रोहित  शिरसागर हे माऊली नगर चे रहिवाशी असून , पावसाळ्याच्या दिवसात तर नागरिकांना आपण रस्त्यातून चालत चालत जातो की पाण्यातून चालत जातो असा प्रश्न पडला आहे हे रस्ते मोहन टाकून दुरुस्त करण्याची साधी तसदी सुद्धा या भागातील ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली नाही डान्सिंग कार्स जर पहावयाचे असतील तर माऊली नगरला भेट द्या असे त्यांचे म्हणणे आहे

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या
  1. असा रस्ता खूप धोका दायक ठरू शकतो तरी या रस्त्याचे काम लवकरात लवकर करून घ्यावे

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा