अशी असेल आषाढी वारी साठी ची नियमवावली

0


पंढरपूर (प्रतिनिधी) - कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असली तरी अद्याप संपूर्णतः या विषाणूचा कहर कमी झालेला नाही. तसेच तिसर्‍या लाटेचा इशारा ही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी देत आहेत. यामुळे आषाढी वारी प्रतीकात्मकरित्या साजरी होत असून 17 ते 25 जुलैपर्यंत पंढरपूर शहराबरोबरच परिसरातील 10 गावांत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत केली.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि लगतच्या दहा गावांमध्ये 17 जुलै ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी राहणार असून या कालावधीत सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. मानाच्या दहा संतांच्या पालख्या विविध भागातून एसटी बसच्या माध्यमातून पंढरपूरला आणण्यात येणार असून वाखरी येथील इथून पंढरपूरपर्यंत प्रतीकात्मक पायी वारी होईल. यासह यात सर्व सर्व वारकर्‍यांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. यासह आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सपत्नीक श्री विठ्ठल व रखुमाईची महापूजा करणार असून यावेळी मंदिरात पन्नासहून कमी जणांना आहे. मागील वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी लोकांच्याउपस्थिती मध्ये  मंदिरात महापूजा संपन्न झाली होती. यंदा ही कोरोणा च्या सावटाखालीच आषाढी यात्रा संपन्न होणार असल्याने दि.17 ते 25 पर्यंत शहरामध्ये संपुर्ण संचारबंदी वर शिक्कामोर्तफ करण्यात आला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)