पंढरपूर (प्रतिनिधी) : देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. यामध्ये सर्वसामान्य शेतकरी, मजूर आणि कामगार होरपळून निघत आहेत. त्यातच महागाईने उच्चांक केला आहे. यामुळे लोकांना जगणे मुश्किलीचे झाले आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य लोक अडचणीत असताना त्यात केंद्र सरकारने इंधन दरवाढ करून लोकांची लूट सुरू केली आहे. याचा निषेध म्हणून पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादीच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली.
आंदोलनादरम्यान उज्ज्वला गॅस सिलिंडर टाक्या पालथ्या घालून त्याला दुधाचा अभिषेक घालून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने इंधन दरवाढ तत्काळ मागे घेऊन सर्वसामान्य लोकांना दिलासा द्यावा; अन्यथा सरकारच्या विरोधात यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप मांडवे यांनी दिला. या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टांग्यात बसून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत स्टेशन परिसरातून ङ्गेरी मारली. या वेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष शहाजी साळुंखे, पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप मांडवे, अरुण कोळी, अनिल अभंगराव, संजय बंदपट्टे, नगरसेवक प्रशांत शिंदे, किरणराज घाडगे, प्रशांत मलपे, दिगंबर सुडके, नागेश ङ्गाटे, अप्पा राऊत, सुहास म्हमाणे, सूरज पावले, रशीद शेख, ङ्गारूक बागवान, अनंता नाईकनवरे, साधना राऊत, चारुशीला कुलकर्णी, कीर्ती मोरे, राधा मलपे, अमृता शेळके, पूजा कोळी, अविंदता बनसोडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


