कोरोणा च्या संक्रमणानंतर चिन चे नियंत्रण सुटलेले रॉकेट कोणत्या देशातील कोणत्या भागात पडेल यांची सर्वाना चिंता लागुन राहिली होती. परंतु चिन चे नियंत्रण गमावलेले चीनचे रॉकेट काही तासांमध्ये पृथ्वीवर कोसळले असल्याची माहिती चिनी माध्यमांनी दिली आहे. चिनी माध्यमांनुसार, नियंत्रण कोसळलेले रॉकेट हिंदी महासागरात कोसळले आहे.
हे रॉकेट 18 हजार मैल प्रति तास या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत होते. बीजिंगमधील स्थानिक वेळ सकाळी 10.24 वाजण्याच्या सुमारास पृथ्वीच्या कक्षेत आले होते. हिंदी महासागरात या रॉकेटचे अवशेष कोसळले असल्याचे वृत्त चिनी माध्यामांनी चीनच्या अंतराळ अधिकार्यांने दिले आहे. रॉकेटचे अवशेष भारत-श्रीलंकेच्या दक्षिण-पश्चिम भागात हिंदी महासागरात कोसळल्याचे अधिकार्यांनी सांगितले. पृ्थ्वीच्या वातावरण कक्षेत शिरत असताना रॉकेटचा बहुतांशी भाग जळून खाक झाला. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रॉकेटचे अवशेष मालदीवच्या हद्दीत कोसळले



