50 ऑक्सिजन बेड असलेले कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन.गरज पडल्यास 50 बेडचे अजून एक अद्यावत कोविड सेंटर उभा करणार - आमदार प्रशांतराव परिचारक

0


पंढरपूर नगरपरिषदेच्या सहकार्यातुन 65 एकर भक्ती सागर येथे डॉ.अमित गुंडेवार व डॉ.पंकज गायकवाड यांच्या विठ्ठल रुक्मिणी डी.सी.एच.सी.कोव्हीड हेल्थ सेंटर उद्घाटन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते, आमदार समाधान दादा आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली, नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसलेउपनगराध्यक्षा श्वेता डोंबेमाजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसटमाजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदममुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्ष नेते अनिल अभंगरावगुरुदास अभ्यंकरतहसीलदार सुशील बेल्हेकरउपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकरतालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधलेआरोग्य समितीचे सभापती विक्रम शिरसटनगरसेवक शकुंतला नडगिरे, संजय निंबाळकर, जगदीश जोजारेविवेक परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पंढरपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून सुमारे 55 लाख रुपये खर्च करून हे कोविड केअर सेंटर उभा करण्यात आले होते. गेल्या वर्षभरामध्ये या कोविड केअर सेंटरचा रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी चांगला उपयोग झाला होता. परंतु सद्य परिस्थितीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील व तालुक्यातील नागरिकांची ऑक्सीजन बेडची कमतरता लक्षात घेऊन याठिकाणी 50 ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करून देण्यासंबंधीचा निर्णय नगरपरिषदेने घेतला होता. त्यास अनुसरून डॉ.पंकज गायकवाड व डॉ.अमित गुंडेवार यांनी पुढाकार घेत हे 50 ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल उभा केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. जर आणखीन गरज पडली तर 50  ऑक्सिजन बेडचे रुग्णालय उभा करण्या संबंधीचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच लवकरच पांडुरंग व युटोपीयन कारखान्याच्या वतीने सुद्धा ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता लक्षात घेता ऑक्सिजनची निर्मिती करून लवकरात लवकर ऑक्‍सिजन उपलब्ध करून दिला जाईल त्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच नूतन आमदार समाधान दादा अवताडे यांनी या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा मिळावी व या हॉस्पिटलमुळे पंढरपूर व परिसरातील कोरोना रुग्णांना माफक दरात उपचाराचा मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले व आमदार म्हणून कोणतीही अडचण आल्यास निश्चितपणे मदत करेन असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमास मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.गिराम, माजी नगरसेवक निलराज डोंबे, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोकेभैया देशमुखनरेंद्र डांगे, डॉ.मिलिंद देशपांडे हे उपस्थितीत होते.

या कार्यक्रमाचे स्वागत डॉ.अमित गुंडेवार, आभार पक्षनेते अनिल अभंगराव यांनी केले.  सूत्रसंचलन उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)