माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची 2021 ची परीक्षा कोरोना परिस्थितीमुळे रद्द करण्यात आली होती. मात्र, याबाबतचे अधिकृत अध्यादेश काढल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे दहावी च्या विद्यार्थ्यांची परीक्षेपासून सुटका झाली आहे.
राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली होती. ङ्गेब्रुवारी व मार्च महिन्यात होणार्या दहावी व बारावीच्या परीक्षा कोरोना परिस्थितीमुळे मे महिन्यापर्यंत घेण्यात आली नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा कधी होणार याची धाकधूक वाढली होती.
यासंदर्भात शासनाने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला तरी त्याची अधिकृत घोषणा झाली नव्हती.दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका कशी द्यावी, गुणांसाठी कोणता आधार घ्यावा आणि अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू करावी याबाबत स्वतंत्र पुन्हा शासनाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत. आता मूल्यांकनानुसार उत्तीर्ण आणि अकरावी प्रवेशाचा त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.



