पंढरपूर (प्रतिनिधी): गाई व म्हैस दोनदा दूध देत असते. हे ताजे दूध सर्व दुकानदारांना पाठवले जाते किंवा घरपोच दिले जाते. दुकानं बंद असल्याने कोणताही रिटेलर दुध घेत नाही किंवा लॉकडाऊन मुळे दुध घरपोच ही करता येत नाही. त्यामुळे सरकारने संध्याकाळीही दूध विक्रिला परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक दिवस झाले जोर धरत होती.
राज्यात सध्या 15 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामध्ये आता आणखी 15 दिवसांची भर पडली असून राज्य सरकारने 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे दुध व्यवसाय करणार्याला रात्री दुधाविक्रीची परवानगी द्यावी.अशी मागणी अधिकच जोर पकडु लागली.
या सर्व बाबी चा विचार केला असता सोलापूर चे जिल्हाधीकारी मा.श्री.मिलींद शंभरकर यांनी एक सुधारित आदेश काढुन दुध विक्री व घरपोच दुध पुरवणार्या दुग्ध व्यावसायिकांना दिलासा देत. रात्री 8.00 ते 11.00 वाजेपर्यंत घरपोच दुध विक्रीस परवानगी दिली गेली आहे. तसेच ज्या भागात घरपोच दुध पोहचविणे शक्य नाही अशा भागात दुध विक्री करणार्या दुकानानाही या कालावधी मध्ये परवाणगी देण्यात आली आहे.
परंतु दुध विक्रेत्यानी कोव्हिड-19 ची रॉपीड अॅन्टीजन टेस्ट करणे बंधनकारक आहे. तसेच दुध विक्री करताना शासनाने घालुन दिलेल्या कोणताही नियम तोडला जाणार नाही याची ही काळजी घेणे बंधनकारक आहे. नियमाचे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे ही सुधारित आदेशात नमुद करण्यात आले आहे.



