पंढरपूर : जगामध्ये कोरोना ची महामारी चालु असताना व लॉकडाऊन असताना सर्व व्यवहार बंद असताना आर्थिक नुकसान होऊन उपासमार होण्याची पाळी सर्वसामान्य व कष्टकरी यांच्यावर आली होती. त्यातच अतिवृष्टीमुळे सर्व धरणे तुंडूब भरल्यामुळे धरण्यातील पाणी नदीला सोडण्यात येत होते. चंद्रभागा दुदडी भरून वाहत होती. पण पाऊसाचा व धरणातील पाणी सोडलेले असल्यामुळे प्रशासनाला किती पाणी नदीमध्ये येणार यांचा अंदाज नव्हता. पण प्रशासनाने नदीकाठच्या सर्व लोकांना सुचना देऊन पुरस्थितीची कल्पना दिली होती.
पंढरपूरातील नदीकाठच्या परिसरातील लोक भयभीत झाले होते. पण किती पाणी येणार यांची कल्पना कोणालाच नव्हती, संततधार पावसामुळे अनेक ओढे,नाले भरून नदीला पाणी मिसळत असल्यामुळे पाण्याचा अ्रंदाज येत नव्हता. आणि त्यातच उजनीतून वेळोवेळी विसर्ग वाढत होता. त्यामुळे पंढरपूरात नदीकाठच्या परिसरात महापूराने थैमान घातले होते. प्रसासनाला सतत च्या होणार्या पावसामुळे तसेच उजनी मधिल होणार्या सतत च्या विसर्गामुळे पाण्याचा अंदाज येत नव्हता, त्यामुळे अचानक रात्रीच्या वेळेस पाण्याची पातळी वाढू लागली. अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर पाणी पातळी वाढणार नाही. आहे एवढी राहील असे अंदाज सांगितले जाऊ लागले त्यामुळे नागरिक आहे या परिस्थितीत आवराआवरी करत होते. पण पहाटे दोन नंतर अचानक पाणी पातळी वाढली व नागरीक हतबल झाले. आहे या परिस्थितीत जसे आहे तसे सामान राहु दिले. त्यामुळे अनेक छोटे मोठे व्यापारी व नागरिक यांना सामान हलवायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पंढरपूर शहरातील आंबेडकर नगर, तानाजी चौक ,संभाजी चौक,कालीका मंदीर परिसर विवेक वर्धीनी परिसर,तांबडा मारूती परिसर,परिचारक वाडा परिसर येथील सर्व दुकानात 4 ते 5 फुट पाणी होते त्यामुळे सर्व दुकानदाराना आपल मौल्यवान वस्तु व व्यापाराचे साहित्य पाण्यामध्ये गेले,तानाजी चौक ,संभाजी चौक,कालीका मंदीर परिसर, विवेक वर्धीनी परिसर या ठिकाणी बागवान समाजाच्या फळाच्या वखारी होत्या त्याचे ही हजारो रूपयाचे नुकसान झाले. तर या परिसरातील अनेक उद्योग धंदे आहेत त्यामध्ये अवजड मशिनीचा वापर होतो. (उदा.प्रिंटीग प्रेस, इलेक्ट्रीक मशिनरी, मिरची कांडप,पिठाची गिरणी ) या मशिनी एका ठिकाणावरून हलवणे शक्य नसते अशा उद्योगधंद्याचेही खुप मोठे नुकसान झाले. त्यातूनही व्यापार्यानी लागेल ती किंमत मोजुन खाजगी वाहनाने आपले सामान सुरक्षीत ठिकाणी हलविले. त्यावेळेस प्रांताधिकारी,मुख्याधिकारी,व लोकप्रतिनिधी यांनी सदरचे नुकसान पुरग्रस्त भरपाई आपणास मिळेल असे सांगीतले पण अद्याप कोणतीही नुकसान भरपाई व्यापाराना मिळाली नाही.
व्यापारांना 15 दिवसात ही रक्कम मिळाली नाहीतर ब्राम्हण सेल सोलापूर जिल्हा कॉग्रेस च्या द्वारे अंादोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे

