पत्रकार सुरक्षा समिती व पत्रकार संरक्षण समिती यांचे संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन उत्साहात संपन्न

0




पंढरपूर (प्रतिनिधी):आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पत्रकार सुरक्षा समिती व पत्रकार संरक्षण समिती या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचा कार्यक्रम नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांचे अध्यक्षतेखाली पत्रकार भवन पंढरपूर येथे दि. 6 जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाला.
    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, डीव्हीपी उद्योग समुहाचे अभिजित पाटील, युवकनेते भगिरथदादा भालके, युवानेते प्रणवदादा परिचारक व माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे तसेच मर्चंट बँकेचे चेअरमन नागेशकाका भोसले यांचेसह पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे, पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष यशवंत कुंभार, पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष जाकीर नदाङ्ग,  आदी मान्यवर तसेच दोन्ही संघाचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरोनाच्या संकटकाळात दुःखद निधन झालेले पंढरपूर तालुक्यातील राजकीय नेते माजी आमदार कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक, आमदार स्व. भारतनाना भालके, राष्ट्रवादीचे नेते स्व. राजूबापू पाटील तसेच ह.भ.प.वै. रामदास महाराज जाधव, भागवताचार्य वै. वा.ना.महाराज उत्पात, पत्रकार स्व. संजय वाईकर यांना आदरांजली वाहण्यात आली.
    यानंतर स्वराज्य दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व पत्रकार दिनानिमित्त आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
    यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांचा सत्कार पत्रकार दत्ताजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांचा सत्कार पत्रकार अपराजित सर्वगोड यांच्या हस्ते करण्यात आला. उद्योजक अभिजीत पाटील यांचा सत्कार पत्रकार डॉ. राजेश ङ्गडे यांच्या हस्ते करण्यात आला. माहिती कार्यालयाचे अधिकारी अविनाश गरगडे यांचा सत्कार पत्रकार विरेंद्रसिंह उत्पात यांच्याहस्ते करण्यात आला. मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले यांचा सत्कार पत्रकार अविनाश साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला तर युवक नेते भगीरथ भालके यांचा सत्कार पत्रकार रामचंद्र सरवदे यांनी केला.
    यानंतर पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांचा सत्कार युवानेते प्रणव परिचारक यांनी केला. पत्रकार सुरक्षा समितीचे नूतन अध्यक्ष यशवंत कुंभार यांचा सत्कार उद्योजक अभिजीत पाटील यांनी केला, तर पत्रकार संरक्षण समितीचे नुतन अध्यक्ष जाकिर नदाङ्ग यांचा सत्कार मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच दोन्ही संघांच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


 

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांनी पंढरीतील पत्रकार बांधवांच्या गृहनिर्माण सोसायटीचा प्रश्न व पत्रकारांचा विमा उतरवण्याचा प्रश्न उपस्थित केला. व यासाठी सर्वच राजकीय नेते मंडळी व प्रशासकीय अधिकारी यांनी तातडीने प्रयत्न करावेत अशी विनंती केली.
    यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे,  पत्रकार सुरक्षा समितीचे उपाध्यक्ष विजयकुमार कांबळे, सहसचिव विश्वास पाटील, प्रसिद्धीप्रमुख अमर कांबळे, बाहुबली जैन, चैतन्य उत्पात, रामकृष्ण बिडकर, संजय यादव, कबीर देवकुळे, मारुती वाघमोडे,राधेश बादले- पाटील, भैरवनाथ कडाळे, खानसाब मुलानी, प्रकाश सरताळे, राजेंद्र काळे, सोहन जैस्वाल तसेच पत्रकार संरक्षण समितीचे Aकार्याध्यक्ष तानाजी जाधव, उपाध्यक्ष संतोष कांबळे व शंकरराव कदम, सचिव शंकरराव पवार, सहसचिव, नामदेव लकडे, प्रसिद्धी प्रमुख लखन साळुंखेे, माजी उपाध्यक्ष उमेश टोमके, सदस्य तानाजी सुतकर, डॉ. शिवाजी पाटोळे, गणेश देशमुख, जैनुद्दीन मुलाणी, गौतम जाधव, धीरज साळुंखे, आनंद भोसले, गणेश गायकवाड, संजय हेगडे, अशोक पवार, सुदर्शन खंदारे, नवनाथ खिलारे आदी उपस्थित होते.
    या कार्यक्रमापत्रकार दिनचे सूत्रसंचालन रवींद्र शेवडे यांनी केले. तर आभार रामचंद्र सरवदे यांनी मानले.






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)