सोलापुरात पाच्छा पेठ परिसरात कोरोना चा पहिला रुग्ण संपूर्ण परिसर पोलीस प्रशासना मार्फ़त सील

0

         सोलापुरात पाच्छा पेठ परिसरात कोरोना चा पहिला रुग्ण मिळाल्याच्या वृत्तास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दुजोरा दिला आहे. हा रुग्ण दहा तारखेला दाखल झाला होता. काल पहाटे म्हणजे दिनांक 11 रोजी तो मरण पावला. आज दुपारी 3.30 वाजता त्याचा कोरोना पॉझिटिव्ह असा अहवाल आला आहे.
          रुग्णाचे वय 56 आहे पोलिसांनी हा सर्व परिसर आता सील करणं सुरू केल असून आजूबाजूच्या लोकांची तसेच या रुग्णाच्या कुटुंबियांची माहिती घेणं सुरू झालं आहे. 
        तसेच लोकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)