पंढरपूर : गेले काही दिवसांपासून पंढरपूर शहरास 2 दिवसा आड पाणी पुरवठा होत होता.पंढरपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दगडी पुलाजवळील बंधाऱ्यातील पाणी संपल्याने ही पाणी कपात नगरपालिका प्रशासनाने पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आज उजनीत धरणातून सोडलेले पाणी या बंधाऱ्यात पोहोचल्याने उद्या म्हणजे सोमवार दि 13 - 4 - 2020 पासून शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले, मुख्यआधिकारी अनिकेत मानोरकर ,उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,पाणी पुरवठा सभापती गुरुदास अभ्यंकर यांनी दिली.

