चैत्री वारी दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटात स्वत:ला गाडुन घेत गणेश अंकुशराव यांचे पांडुरंगाला साकडे... गो कोरोना गो!

0
 
          पंढरपूर (प्रतिनिधी):- चैत्री वारीच्या दिवशी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी स्वत:ला चंद्रभागेच्या वाळवंटात स्वत:ला गाडुन घेत ‘पांडुरंगा कोरोनाचे देशावर आलेले संकट परतवुन लाव’ असे साकडे घालत विठोबा रखुमाई च्या जयघोषासोबतच ‘गो कोरोना गो!’ चा नारा दिला.
        कधी नव्हे ती इतिहासात प्रथमच चैत्री एकादशीच्या दिवशी पंढरीत भरणारी मोठी वारी यंदा कोरोना विषाणुच्या संकटामुळे भरलेली नाही. ज्या चंद्रभागेच्या वाळवंटात आजच्या दिवशी साधुसंतांचा भव्य मेळा भरलेला असतो, हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने अवघी पंढरी नगरी दुमदुमुन गेलेली असते ते चंद्रभागेचे वाळवंट आणि भुवैकुंठ पंढरी नगरी आज सुनी सुनी झालेली आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार आज वारकरी भाविकांनी पंढरीकडे पाठ फिरवलेली आहे. हे चित्र अतिशय क्लेशकारक आहे. याचा खेद व्यक्त करण्यासाठी व कोरोनाच्या संकटातुन अवघ्या विश्‍वाला मुक्त करण्याची प्रार्थना पांडुरंगाला करण्यासाठी आपण चंद्रभागेच्या वाळवंटात स्वत:ला गाडुन घेऊन आज चैत्री वारीच्या दिवशी श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणावर भक्त पुंडलिकाच्या साक्षीनं प्रार्थना केली. असे मत गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
        कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अवघ्या जगभरातुन शर्थीचे प्रयत्न होताना दिसत आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांनीही कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. परंतु प्रशासनाचे आदेशानुसार कांहीजण वागताना आढळत नाहीत ही गोष्ट गंभीर आहे. पांडुरंगाला कोरोनाचे संकट घालवण्यासाठी साकडे घालतानाच गणेश अंकुशराव यांनी समस्त देशवासीयांना भीवरेच्या तीरावरुन प्रशासनाचे आदेश पाळण्याचे व आपल्या घरातुन बाहेर न पडण्याचे नम्र आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 5 तारखेला रात्री 9 वाजता 9 मिनिटासाठी आपापल्या घरातील लाईटस् बंद करुन दिवे लावण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे तर दुसरीकडे पंतप्रधानाचे हे आवाहन पाळु नका, घरातील लाईटस् सुरुच ठेवा असे कांही मंत्री सांगत आहेत. यामुळे जनता द्विधा मन:स्थितीत आहेत. याचा खुलासा राजकीय नेत्यांनी करावा. अशी विनंतीही गणेश अंकुशराव यांनी केली आहे.  
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)