आमदार भारत भालके यांच्याहस्ते पंढरपूरमध्ये दोन ठिकाणी शिवभोजन केंद्राचे उदघाटन संपन्न

0
पंढरपूर :- पंढरपूर : कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्याकरिता देशभरात 21 दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर करण्यात आल्याने हातावर पोट असणार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आणि मजुरीसाठी पंढरपुरात राहिलेले मजूर, निराश्रित, बेघरांची उपासमार होत आहे. संचारबंदी मुळे पंढरपूरमध्ये असे शेकडो लोक अडकून पडले आहेत. या साठी पंढरपूर शहरात दोन ठिकाणी शिवभोजन केंद्राची सुरवात झाली आहे. या केंद्राचे उद्घाटन आमदार भारत भालके यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रातांधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, प्रशांत खलिपे, प्रशांत खुळपे, संदीप मांडवे, सुभाष भोसले, पिंटु मांडवे, संतोष बंडगर, वैभव अलदर आदी उपस्थित होते.
           कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात पाच रुपयांना ही थाळी मिळणार आहे. शहरातील जनकल्याण हॉस्पिटल समोर साई हॉटेल आणि पश्चिम द्वारला येथे ही दोन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. याठिकाणी दररोज १५० जणांच्या भोजनाची सोय करण्यात येणार आहे.गरजू आणि गरिबांना लाभ मिळावा-आमदार भारत भालके राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ शिवभोजन केंद्र सुरु केले आहेत. मजुरी गमावलेल्या गरिबांना याचा लाभ मिळावा. कोणीही उपाशी राहु नये असे आवाहन आमदार भारत भालकेंनी केले.
          प्रशांत खलिपे शिवभोजन थाळीचे मोफत वाटप केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत खलिपे हे लॉकडाऊनच्या काळात १४ एप्रिल पर्यंत शिवभोजन थाळीचे मोफत वाटप करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)