पंढरपूर : अभ्यासाने विद्यार्थ्यांचा बौद्धिक हा एकांगी विकास होतो. मात्र कलेने विद्यार्थ्यांचा मानसिक भावनिक सौंदर्य संवेदनशीलता कलास्वाद क्षमता असा परिपूर्ण विकास होतो त्यामुळे अभ्यासासोबत कलेची जोड आवश्यक आहे चित्र काढत असताना त्यांच्या भावविश्वातील आनंद दुःख राग लोगो या सर्व भावनाना वाट मिळते.
कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्याकरिता देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे. आपला भारत देश एका विकसित स्तरावर वाटचाल करत असतानाच....आपल्या भारत देशावर जागतिक संकट आले आहे. कोरोना या विषाणु वायरस मुळे समाजातील प्रत्येक घटकावर प्रत्येक्ष व अप्रत्यक्ष रीत्या परिणाम होत आहे. त्यावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी घरी राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. संसर्ग चा प्रधुर्भाव टाळण्यासाठी म्हणून सरकारने सर्व शाळा,महाविद्यालये इतर गर्दी होणारी सर्व ठिकाणे काही कालावधी साठी बंद करण्यात आली आहेत. म्हणुन आपण सर्वजण घरी निवांत असाल ह्या हेतुने मी विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक मित्रांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा ह्याच हेतूने एन एम मंच तर्फे युवा चित्रकला ऑनलाइन स्पर्धा 2020 चे आयोजित केली आहे.
ही स्पर्धा दोन वयोगटामध्ये घेतली जाणार असून प्रथम गट 5 ते 15 वर्ष वयोगट या साठी चे विषय खालील प्रमाणे आहेत. 1)निसर्ग चित्र 2)क्रिकेट मॅच 3)नृत्य करणारी मुलगी 4)पोलीस स्टेशन 5)झाडे 6)देव/देवी 7)पर्वत 8)पक्षी/प्राणी
द्वितीय 16 ते 22 वर्ष वयोगट या साठी चे विषय खालील प्रमाणे आहेत. 1)उत्सव 2)किल्ला 3)स्वच्छ भारत 4)व्यक्तिचित्र 5)ग्रामीण जीवन 6)प्रतिबिंब 7)जंगल आणि प्राणी 8)रेल्वे.
* ही स्पर्धा विनामूल्य ऑनलाइन स्पर्धा आहे. *स्पर्धकांने स्वत: चित्र रेखाटलेले असावे. *चित्र फक्त रेखाटायचे आहे. रंग भरायचे नाहीत,रंग काम करायचे नाही.वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर चित्र काढायचे आहे. कोणत्याही कागदावर चित्र काढता येईल.एका स्पर्धकास एकच चित्र पाठवता येईल.* चित्र फोटो व्यवस्थित काढून पाठवावेत.
आपले चित्र दिनांक 22 एप्रिल 2020 पर्यंत खालील ई-मेल किंवा व्हाट्सअप वर पाठवावेत. दिनांक 25 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी निकाल आपणांस कळण्यात येईल.आपले चित्र penurmoholgmail.com या ई-मेल वर किंवा 9545434292 व्हाट्सअप क्रमांक वर पाठवावेत.अधिक माहिती साठी विशाल नामदेव माने. विद्यार्थी-क.भा.पा महाविद्यालय पंढरपूर.एन.एस.एस स्वयंसेवक
संपर्क-9545434292 या क्रमांकावर संपर्क साधावा




