पंढरपूर : कोरोना महामारीच्या काळात पुढील तीन महिने केशरीकार्ड धारक व गरजूंना रेशनचे अन्नधान्य पुरबठा करणेबाबत केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री महोदयांना संपर्क करून निवेदन दिले असता याबाबत त्यांनी सकारात्मक निर्णय घेवू असे आश्वासित केलेची माहिती आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.
जागतिक कोरोना (कोविड-१९) महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने रेशनकार्ड धारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण
योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो पुढील तीन महिन्याचे मोफत धान्य देणेचे जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्था व अन्न सुरक्षा या योजनामध्ये समाविष्ट असणाऱ्या कार्डधाकरांनाच रेशनवरती धान्य मिळणार आहे. परंतु ज्यांचेकडे केशरी कार्ड आहे, अशा कार्डधारकांना त्यामधून वगळले गेलेले आहे. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातून जवळपास ७०००० केशरी कार्डधारक या लॉकडाऊनच्या काळात या योजनेपासून वंचित राहणार आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातून जवळपास दोन ते अडीच लाख केशरी कार्डधारक या काळात वंचित राहणार आहेत.
या केशरी कार्ड धारकांमध्ये लहान-लहान उद्योग करणारे लोक आहेत, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात ४४,००० व शहरी भागात ५९,००० पेक्षा जास्त ब १ लाखापेक्षा कमी आहे. यामध्ये इस्त्री, सलून, चप्पल दुकानदार, हातगाडे, बाजारात कपडे विकणारे, टांगा-रिक्षाचालक, नदीवरील होडीचालक, हारफुले-कुकू बुक्का विकणारे, खाजगी नोकरदार, शेतकरी, मजूर अशा अनेक लोकांना या संचारबंदीचे काळात उद्योगधंदे बंद राहणार असल्यामुळे प्रचंड अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अशा हातावरचे पोट असणारे, रोज कमवून खाणारे लोकांचा देशातील लॉकडाऊनने उद्योग थांबल्यामुळे त्यांचे उत्पन्न थांबले आहे.
जिल्ह्यातील ११ तालुक्यातील या योजनेपासून वंचित व गरजू लोकांना ज्यांचा समावेश या योजनांमध्ये नाही. अशा सर्व रेशनकार्ड धारक व ज्यांचेकडे रेशनकार्ड नाही अशा गरजू कुटंबांना या 'लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ येवून यासाठी तरी रेशनवर अन्नधान्य वाटप करणे गरजेचे आहे यासाठी शासन स्तरावर सकारात्मक विचार होणेबाबत रस्ते व
वाहतूक केद्रींय मंत्री मा.नितीनजी गडकरी, अन्न व सार्वजनिक वितरण केद्रींय राज्यमंत्री मा.रावसाहेब दानवे पाटील, माहिती
व प्रसारण केंद्रीय मंत्री मा.प्रकाशजी जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा
पवार, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.छगनजी भुजबळ, मा.देवेंद्रजी फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष
मा.चंद्रकांतदादा पाटील यांचेशी संपर्क करून निवेदन पाठविले. याबाबत केंद्र ब राज्य सरकार तर्फे लबकरच निर्णय होईल असे आश्वासित केलेचे त्यांनी यावेळी सांगितले.

