बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर निश्चितच गुन्हा दाखल होऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यासोबत जिल्ह्यातील ग्रामस्थांनी त्यांचा कोणीही नातेवाईक असो अथवा ओळखीचे त्यांना आवर्जून सांगावे की विनापरवाना कुणीही गावात यायचे नाही. जिथे आहेत तिथेच राहण्यास सांगावे. तेच सुरक्षित आहे. काही लोकांना प्रवासाच्या दरम्यान कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे.
पुढे सांगताना मनोज पाटील म्हणाले की कोणत्याही नागरिकाला बाहेरून येणारी व्यक्ती आढळल्यास कंट्रोल रूमच्या 100 नंबरवर किंवा 2732010 क्रमांकावर संपर्क साधावा. केवळ पुणे ,मुंबईच नाही तर कोणत्याही जिल्ह्यातून आपल्याकडे व्यक्ती आल्यास त्याची माहिती प्रशासनाला द्यावी. जे लोक अशा पद्धतीने आलेले आहेत त्यांची माहिती मिळाल्यास त्यांना बाजूला ठेवून त्यांच्यावर कारवाई करून उपचार करण्यात येतील. तरच आपला जिल्हा कोरोना मुक्त होऊ शकेल. असेही ही त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना आवाहन केले आहे.

