पंढरपूर : सोलापूर शहर आणि सांगोला तालुक्यातील घेरडीपुरता मर्यादित असलेल्या कोरोनाचे संकट आता पंढरपूरच्या वेशीवरती येऊन ठेपले आहे. पंढरपूर-मोहोळच्या परिघामध्ये असलेल्या पाटकुलमध्ये एक गर्भवती कोरोना रुग्ण महिला आढळली असून तिला उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे. तथापि आज प्रशासनाने तातडीने पाटकुल, पेनुर परिसर सील केला असून तेथील संचारबंदी कडक केली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज रात्री उशिरा पत्रकार परिषदेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची माहिती देत असताना सोलापुरातील संख्या ६१ वर गेली असल्याचे जाहीर केले, तर यापैकी पाच रुग्ण हे मयत असून दोन रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याचे सांगितले. यापैकी एक सांगोला तालुक्यातील घेरडी येथे कालच निष्पन्न झाला होता, तर आज मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील महिलेचा समावेश आहे असे सांगण्यात येते. दरम्यान ही महिला पंढरपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी ऍडमिट होती. त्यामुळे पंढरपुरात देखील नागरिक घाबरून गेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने संबंधित महिलेच्या संपर्कामध्ये आणि संसर्गामध्ये जे लोक येऊ शकतात अशा संभाव्य लोकांना कॉरंटाईन करून त्यांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. रात्री उशिरा पंढरपूरमध्ये ही बातमी पसरताच संपूर्ण पंढरपूर जवळपास बंद झाले त्यामुळे दरम्यान संबंधित महिला ही गर्भवती असताना पंढरपूरमधील हॉस्पिटलमध्ये दाखल होती. त्यानंतर तिची प्रसूती झाली. तथापि तिची प्रकृती बिघडल्याने पुन्हा तिला सोलापूरला पाठवण्यात आले. सोलापूरला गेल्यानंतर तिची पूर्ण चाचणी घेण्यात आली. त्यावेळी ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे तातडीने हालचाली करून पेनुर, पाटकुल परिसर सील करण्यात आला. कोरोना बाधिताची संख्या ६१:- जिल्ह्यामधील कोरोना बाधिताची संख्या आता ६१ इतकी झाली आहे. यातील ५ जणांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज मिळालेले रुग्ण अकरा आहेत यात एका ५७ वर्षीय महिलेचा समावेश आहे सारी आजारामुळे या महिलेचा काल दाखल करण्यात आलं होतं आज तिचा मृत्यू झाला तिचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे.
पाटकुल, पेनुर परिसर सील, जिल्ह्यामधील कोरोना बाधिताची संख्या आता ६१
एप्रिल २७, २०२०
0
Tags

