भिमशक्ती मंडळाचे कार्यकर्ते आले गोरगरिबांच्या मदतीला धावून

0
पंढरपूर : राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढताहेत. हा  रोग संसर्गजन्य असल्याने खबरदारी म्हणून संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे पंढरपूर येथील  रोजंदारी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा नागरिकांना पंढरपूर येथील भिमशक्ती तरुण मंडळ व संतोषजी सर्वगोड मित्र मंडळाच्या वतीने गहू,तांदूळ यासह जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
पंढरपूर येथील भंगार गोळा करणारे तसेच मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना संचार बंदीमुळे घरातच बसून राहावे लागत आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेऊन भिमशक्ती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी सर्वगोड यांनी सामाजिक भान जपत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना मदतीचा हात दिला आहे. 
यावेळी नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड, राहुल मोरे,युवक नेते उमेश सर्वगोड, दत्ता चंदनशिवे, पंढरपूर नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, आयतवाड , पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनिल  वाळुजकर,वंचितचे रवि सर्वगोड, लखन लामकाने, ऋषिकेश भोरकडे, अजय चंदनशिवे, रशीद मुलाणी यांचे सहकार्य या उपक्रमास सहकार्य लाभले. यावेळी भिमशक्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)