सोलापूर जिल्ह्याला गेल्या तीन महिन्यात तीन पालकमंत्री लाभले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. वळसे-पाटील यांनी कामगार व राज्य उत्पादन शुल्क ही दोन्ही महत्त्वाची खाती सांभाळत असताना कामाच्या वाढत्या व्यापामुळे सोलापूरच्या पालकमंत्रिपदावरून मुक्त करण्यात आले.
सोलापूरचे पालकमंत्री तिसऱ्यांदा बदलले , पालकमंत्री पदी दत्तात्रय भरणेंची नियुक्ती
एप्रिल २२, २०२०
0
सोलापूर : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सोलापूर जिल्ह्याला तिसरा पालकमंत्री मिळाला. याआधीचे पालकमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या होम क्वारंटाइनमध्ये असल्याने इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Tags

