पंढरपूर : सध्या राज्यात कोरोनाने हाहाकार घातला आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. महाभयंकर संकटाचा आपण सामना करत असताना शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालेय... अनेक अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा विविध सामाजिक संघटनांकडून केला जातोय. अशाच पध्दतीने मौजे पंढरपूर तालुक्याच्या लक्ष्मी टाकळी येथील ग्रामस्थांना भरीव मदतीचा हात दिलाय शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश देविदास साठे यांनी.
छत्रपती बहुद्देशीय संस्था व एम.डी. साठे मित्रपरिवार ग्रुप यांच्या वतीने मौजे टाकळी येथील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे कीट घरपोहोच देण्यात येत आहे. मोफत भाजीपाला पुरविण्यासाठी शिवभाजीपाला वाटप केंद्र सुरु केले आहे. हे कार्य करत असताना त्यांनी कांही अतिमहत्वाचे नियमही घालुन दिले आहेत. (1).तोंडाला मास्क अथवा रूमाल असने बंधनकारक आहे. (2).प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये किमान 5 फूटाचे अंतर ठेवावे. (3).भाजीपाला घेते वेळेस एकत्र गर्दी न करता लाईन मध्ये यावे. अशा प्रकारच्या बंधनांचे पालन करुन महेश साठे व मित्रपरिवाराने सुरु केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दि. 18 एप्रिल 2020 पासुन सुरु केलेलं हे कार्य येत्या 3 मे 2020 पर्यंत अखंडीतपणे सुरु ठेवणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश नाना साठे यांनी बोलताना दिलीय.

