अॕनिमल संस्थेचा स्तुत्य उपक्रम डॉक्टर प्रल्हाद भिसे..

0
 पंढरपूर :  पंढरपूर ॲनिमल संस्था गेल्या पंधरा वर्षापासून जनावरासाठी काम करते या संस्थेतर्फे आपल्याकडील गाय म्हैस,बैल,कुत्रे व इतर जनावरे यांना कुठलाही आजार असल्यास त्यावर आपल्याकडे येऊन उपचार करतात.
  कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन झाल्यानंतर सर्वात जास्त हाल कुणाचे झाले असतील ते भटक्या जनावराचे झाले आहेत त्यात सध्या भटक्या कुत्र्यांना ही संस्था रस्तोरस्ती जाऊन खाद्य पुरवठा करत आहे ही संस्था सोलापूर पंढरपूर सातारा, सांगली ,या जिल्ह्यात कार्यरत आहे पंढरपूर व शहर उपनगरे कोर्टी,उंबरगाव लक्ष्मी टाकळी सिद्धेवाडी एकलासपूर,अनवली बोहाळी अशा पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक खेड्यात सेवा चालू आहे यावेळी बोलताना डॉक्टर प्रल्हाद भिसे म्हणाले की आपल्या जनावरा बद्दल कुठलीही तक्रार आजारपण असल्यास रेल्वे स्टेशन जवळील बालाजी लाॕज च्या पाठीमागे ऑफिस आहे येथे समक्ष किंवा आपत्ती फोन नंबर 95 52 55 20 49 या नंबर वर संपर्क साधावा संपर्क साधल्यास आपल्यास सर्व सहकार्य आपल्या जागेवर येऊन आपल्या जनावरांवर उपचार केले जातील.
    या सेवेत वैभव पाटील, माधवानंद पवार, गणेश धोत्रे , विकास खंदाडे,  सिद्धार्थ सोनवणे,  बाळासाहेब नागटिळक हे कार्यरत आहेत या  कार्याबद्दल सर्वसामान्य जनतेतून आभार व्यक्त होत आहेत.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)