पंढरपूर : महाराष्ट्र मधील व पंढरपूर शहरांमधील सर्व मुस्लिम व इतर समाज बांधवांना जगभर आलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 25 एप्रील रोजी रमजान महिन्याला सुरुवात होत असुन या काळात सोशल डिस्टन्सिंग म्हणून मुस्लिम बांधवांनी व इतर सामाजिक संघटनांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करु नये.
कोरोना च्या या लढाईला सर्व मुस्लिम बांधवांनी सहकार्य करावे. असे आवाहन तमिम सय्यद इनामदार (जिल्हा सरचिटणीस भाजप अल्पसंख्यांक मोर्चा सोलापूर)यांनी केले आहे.
मना-मनामधील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव, सदभाव, वाढविण्यासाठी हा महिना संयम,त्याग,शांती सहिष्णुता, चांगुलपणा,प्रामाणिकपणा माणसाच्या ठायी बिणावा यासाठी या सणाचे आयोजन करण्यात येते.
शहरासह ग्रामीण भागात मुस्लिम बांधव व इतर सर्व समाजातील नागरिकांसाठी पवित्र रमजान महिण्याचे औपचारिक साधून सर्व समाजातील राजकीय, सामाजिक संघटना,पत्रकार व इतर व इतर इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजासह इतर सामाजिक संस्था व समाजातील पदाधिकार्यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन व एकत्रीत नमाज पठण न करता आपल्या परिसरातील गोरगरीब गरजुबंताना अन्नधान्यचे वाटप करावे. व आपापल्या घरी नमाज पठनासह इबादत/तिलावत करावे
(ईश्वर) अल्लाह सार्या जगातील जीवबितांना (मानव,पशु,पक्षी..)
सुखी ठेवण्यासाठी दुआ करावी तसेच प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन तमिम सय्यद इनामदार यांनी केले.

