सोलापुरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता १२

0
पंढरपूर : सोलापुर शहरात आता कोरोनाचे आणखी दहा रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात तेलंगी पाच्छा पेठेतील महिलेच्या संपर्कातील नऊ जणांचा समावेश आहे.
सोलापूर शहरातील तेलंगी पाच्छा पेठेतील 56 वर्षीय किराणा दुकानदाराचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. या दुकानदाराच्या थेट संपर्कात आलेल्या 148 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. यात एका महिलेला कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेच्या संपर्कातील २२ जणांचे स्वॅब घेण्यात आले.
यात तेलंगी पाच्छा पेठेतील महिलेच्या संपर्कातील नऊ जणांचा समावेश आहे. एक व्यक्ती किराणा दुकानदाराच्या संपर्कातील आहे. हे सर्वजण सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल आहेत. या महिलेच्या घराजवळचा एक किलोमीटरचा परिसर यापूर्वीच सील करण्यात आला आहे.
कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे  रिपोर्ट गुरुवारी सकाळी प्राप्त झाले आहेत. यात नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला पूर्व भागातील एका हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, ब्रदर यांच्या स्वॅब चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. किराणा दुकानदाराच्या संपर्कातील एका व्यक्तीला काेरोनाची लागण झाली आहे. सोलापुरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)