इंदुरीकर महाराजांचा कोरोना लढ्यात पुढाकार, राज्यसरकार ला दिला निधी.....
एप्रिल ०१, २०२०
0
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रामध्ये हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाविरोधात लढ्यासाठी राज्य सरकारने सढळ हाताने मदत करावं असं आवाहन केलं आहे.अनेक खेळाडू,अभिनेते,गायक यात सहभागी झाले आहेत आत्ता प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनीही कोरोनाविरोधात लढ्यात खारीचा वाटा उचलला आहे.प्रबोधनकार इंदोरीकर महाराज देखील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. इंदुरीकर महाराजांनी आज एक लाख रूपयांचा धनादेश संगमनेर तालुक्याचे तहसीलदारांकडे सुपूर्द केला आहे. कोरोना सहायता निधीत त्यांनी आपल्याकडील 1 लाख रूपये देणगी दिली आहेत.
Tags

