पुढील तीन महिने कर्जदारांकडून कर्जाचा हफ्ता न घेण्याचा निर्णय सर्वसामान्य कर्जधारकांना काही प्रमाणात दिलासा

0
         मुंबई - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाठोपाठ आता भारतातातील चार मोठ्या बँकांनी त्यांच्या कर्जधारकांना दिलासा दिला आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सर्व बँकांना पुढील तीन महिने EMI घेऊ नका असा सल्ला दिला होता. पण पुढील निर्णय बँकेच्या स्वाधीन केला होता.
        दरम्यान या महिन्यात लॉकडाऊनमुळे अनेकांना सध्या घरी बसावं लागतंय, अनेकांचं कामकाज ठप्प आहे. अशात अनेकांना आपल्या EMI ची काळजी आहे. कामकाज बंद असल्याने वेळेवर पगार होणार की नाही याबाबत नोकरदारांकडून चिंता व्यक्त केली जातेय.   तसेच छोटे व्यवसायिक , रिक्षा चालक, असे लोक जे रोज काम केलं तर चूल जळते आणि उर्वरित सेविंग हे EMI जाते आशा अनेक लोकांना EMI ची काळजी लागून राहिली आहे . पण अशा लोकांना दिलासादायक बातमी आहे.
       अशात आता भारतातील IDBI बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांनी पुढील तीन महिने कर्जदारांकडून कर्जाचा हफ्ता न घेण्याचा निर्णय घेतलाय. बँकांच्या या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळालाय.या सर्व बँकांनी कर्जाचे EMI घेणार नसल्याचं सांगितलंय, क्रेडिट कार्डच्या बिलांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही ...
          एक एप्रिलपासून नवीन महिना सुरु होतो या बँकांनी यांनी पुढील तीन महिने कर्जाचा हप्ता पुढे ढकलला आहे. म्हणजेच जर तुमचं कर्ज १५ वर्षांचं असेल तर ते आता तीन महिने पुढे म्हणजे पंधरा वर्ष ३ महिने सुरु राहील. दरम्यानच्या काळात बँकांकडून कर्जाचा हप्ता आकाराला गेला नसल्याने तुमच्या आमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये कोणताही बदल होणार नाही.
       या बँकांमागोमाग आता इतर बँक देखील EMI स्थगितीचा बद्दल निर्णय घेऊ शकतात, तशी घोषणा होऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)