कोरोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच -श्री.अजित पवार

0
महाराष्ट्र : कोरोनाशी लढा देणार्‍या महाराष्ट्र पोलिसांसाठी राज्य सरकारने दिलासादायक घोषणा केली आहे. कोरोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली.तसेच ही माहिती आजित पवार यांनी आपल्या ट्टिटर पेज वर ट्विट करून शेअर केली.
राज्यातील पोलिस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचार्‍याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली
गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. आरोग्य, वैद्यकीय, पोलिस विभागांना प्राधान्याने वेतन देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मार्च महिन्याचे वेतन प्राधान्याने देणार असल्याचंही अजित पवार म्हणाले. कोरोना विरुद्धच्या लढ्यात होमगार्डचीही मदत घेतली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)