राज्यात कोरोना सारख्या महा विषाणुचा फैलाव जोरात सुरु आहे.कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू व लॉक डाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून त्याचा परिणाम काही नागरिकांच्या कामावर , पगारावर होणार आहे. तसेच सर्वाचे गाडयाचे ९९% व्यवसाय बंदच आहेत . या महिन्यात व्यवसाय खूपच कमी झाला आहे . घर खर्च देखील सुटला नाही . मालवाहतूक , पँसेजर गाडया तसेच जेसीबी ब्रेकिंग सारख्या मोठया मशिनरी गाडयाचे व्यवसाय खूपच कमी झाला आहे. त्यांना गाडीचे हप्ते भरणे या महिन्यामध्ये शक्य होताना दिसत नाही.
तरी आपण पुढील पुढील दोन - तीन माहिन्यापर्यन्त EMI / हप्ते पुढे ढकलावे व चेक बाउन्स चा दंड , हप्त्याचा दंड वसूल करू नये असे संबंधितांना आपणाकडून आदेश व्हावेत , ही विनंती छावा क्षात्रवीर सेने तर्फ़े आम्ही मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना करणार आहे असे मध्यमा शी बोलताना सौ अश्विनी श्रीमंत भापकर
छावा क्षात्रवीर सेना पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्ष यांनी सांगितल
सौ अश्विनी श्रीमंत भापकर
छावा क्षात्रवीर सेना पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्ष

