आज आपण पाहतोय देशात नव्हे जगात कोरोना या महामारीने हाहाकार माजवला आहे ,
हा रोग हा एकमेकांच्या संपर्कात आल्यावर होत आहे , यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारने जो जनता संचारबंदीचा आदेश देण्यात आला आहे त्याचे पालन करणे आपले आद्य कर्तव्य आहे .
तरी सर्वांनी मिळून आज या मराठी नवीन वर्षाचा संकल्प म्हणून सरकारचा पुढचा आदेश येईपर्यंत घरात बसून या महामारीला कायमचे नष्ट करूया.
कोणीही अफवा पसरवून जनतेच्या मनात भीती निर्माण करू नये असे , सर्वांनी पोलीस अधिकारी, डॉक्टर , व शासकीय कर्मचारी यांना मदत करून आपले मोलाचे सहकार्य व देशासाठी सेवा करूया .
तुम्ही बातमीला पाहिलेच असेल इस्लामपूर मध्ये संपूर्ण कुटुंब या रोगाला बळी पडले आहे त्यांच्यावर उपाय चालू आहेत तशी वेळ आपल्यावर येवु नये म्हणून आपण सर्वांनी संकल्प करून या कोरोनाला कायमचे नष्ट करू असे आव्हान छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवश्री.समाधान (दादा) सुरवसे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले .

