श्री.अरुण कोळींच्या नेतृत्वात कोळी महासंघाने शेकडो लोकांना पोटभर जेवण....

0
पंढरपूर : कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्याकरिता देशभरात 21 दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर करण्यात आल्याने हातावर पोट असणार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आणि मजुरीसाठी पंढरपुरात राहिलेले मजूर, निराश्रित, बेघरांची उपासमार होत आहे. संचारबंदी मुळे पंढरपूरमध्ये असे शेकडो लोक अडकून पडले आहेत. त्यांना मायेचा हात देण्यासाठी पंढरीत हजारो हात सरसावले आहेत. श्री.अरुण कोळींच्या नेतृत्वात कोळी महासंघाने शेकडो लोकांना पोटभर जेवण देण्यास सुरवात केलीय.
          चंद्रभागेच्या वाळवंटात शेकडो लोक अर्ध्या भाकरीसाठी फिरत आहेत.मंदिर समितीच्या वतीने डालखिचडीची सोय केलीय. मात्र संख्या वाढत असल्याने आजपासून कोळी महासंघाने आपला हात पुढे केलाय. दत्त घाट,पुंडलिक मंदिर, चंद्रभागा घाट, चंद्रभागा वाळवंटात राहणाऱ्या शेकडो लोकांना चपाती, भाजी, भात असे पोटभर जेवण दिले जात आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)