नागरिकांना पोलिसांनी मारहाण करू नये - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मार्च २९, २०२०
0
मुंबई : गावे आणि शहरांमध्ये पोलीस अचानक दुचाकीस्वार, पादचाऱ्यांना अडवतात आणि कोणत्या कारणासाठी ते बाहेर पडले आहेत याची साधी चौकशी न करता थेट लाठ्यांनी मारायला सुरुवात करतात असे व्हिडिओ गेले चार दिवस महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संचारबंदीच्या काळात रस्त्याने फिरणाऱ्या सामान्य नागरिकांना पोलिसांनी लाठ्यांनी मारावे की मारू नये ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशी मारहाण करू नका असे बजावले असताना नागरिकांना पोलिसांकडून मारहानी च्या गोष्टी सरास घडत होत्या या आधी ही मा.मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की आपण जगणं सोडलं नाही तर फक्त जगण्याची शैली बदली आहे . सकाळी उठल्यावर अनेकदा अनेक कामसाठी आपल्याला बाहेर पडावे लागते. मग ते भाजी पाला असो व जीवनावश्यक इतर गोष्टी साठी असो म्हणून पोलिसांनी पण याच भान ठेवावे. नागरिकांना पोलिसांनी एकमेकांशी समन्वय साधावा असे माध्यमाशी बोलताना लाईव सांगितले होते पण तरी नागरिकांना मानहानी च्या घटना घडत असल्याने त्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना फोन करून अशा पद्धतीने नागरिकांना पोलिसांनी मारहाण करू नये असे बजावले.
Tags

