आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे सांगण्या वरून जनतेला घर बाहेर पडू नये अशी मागणी फेसबुक लाईव्ह वरून केली
करोनाशी लढण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा द्यावा- शरद पवार
मार्च २७, २०२०
0
राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना यांनी काही निर्णय तातडीने घेतले आहेत. करोनाचं संकट लक्षात घेऊन आपण हे सगळं करतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. करोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं, देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन होणार आहे यात काहीही शंका नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. करोनाशी लढा आपण एकत्रितपणे देऊ. सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करा असंही आवाहन शरद पवार यांंनी केलं.
Tags

