पोलिसांना नाष्टा व बिस्लेरी पाणी बॉटल -निलेश माने

0

पंढरपूर प्रतिनिधी- देशभरात भयाण वेगाने वाढणारा विषाणू म्हणजे कोरोना वायरस या वायरस ने अनेकांची जीव घेतली आहेत. चौदा एप्रिल पर्यंत संचारबंदी आहे.आपल्या देशावर खूप मोठे संकट आले असून सर्वांनी एकत्रित येऊन या कोरोना वायरस ला हरवण्यास घरात बसलेले आहेत.

मार्च महिना आहे या महिन्यात भयाण उन्ह व उष्णता असते.पण आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस प्रशासन अहोरात्र झटत आहे. २४ तास ऑन ड्युटी वर पोलीस कर्मचारी आहेत. संचारबंदी मुळे कोणतेही हॉटेल, दुकान, उघडे नाहीत यांना पाणी, चहा, नाष्टा, जेवण भेटत नाही. हे भूक ताण हरवून आपल्या साठी सज्ज उभे आहेत. यांना ही घर आहे, संसार आहेत, मुलं आहेत, घरातील वयोवृद्ध आजारी आहेत; तरी सुद्धा घराचा विचार न करता हे देशासाठी, महाराष्ट्रासाठी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या जीवासाठी त्यांच्या कुटुंबासाठी हे झटताहेत. याच नागरिकांनी भान ठेवावे व नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी असे संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी पंढरपूरकरांना आव्हान केले.

     पोलीस प्रशासनासाठी पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशन च्या वतीने देशाचे व महाराष्ट्राचे रक्षण करते पोलीस प्रशासनाला असल्या भर उन्हात चालत पंढरपूर फिरून त्यांना नाष्टा व बिस्लेरी बॉटल देण्यात आली. आणि आपलं कर्तव्य म्हणून तोंडाला मास्क व अरदातासाला हॅन्डवोश ने हाथ धुवुन आपलं व आपल्या परिवाराचा देखील विचार केला गेला. सलाम या महाराष्ट्र पोलीसांना

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)